तुमचे डिमॅट खाते उघडण्यासाठी, तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या सोयीचे डिपॉझिटरी सहभागी (डीपी) निवडणे आवश्यक आहे. सीडीएसएल कडे देशभरात विस्तारलेले सर्वोत्तम डीपींचे जाळे आहे. तुमच्या घराच्या किंवा कामाच्या ठिकाणाच्या नजीक असलेल्या डीपी शोधण्यासाठी खालील आमचे सर्च इंजिन वापरा.
तुम्ही तुमची निवड केल्यानंतर, तुम्हाला तुम्ही निवडलेल्या डीपी च्या माहितीपूर्ण पेजवर नेले जाईल. पेज द्वारे तुम्हाला डीपी आणि सेवा केंद्राच्या शुल्क संरचना विषयी माहिती मिळेल. तुम्ही सर्व डीपीच्या टॅरिफ संरचनेची तुलना देखील डाउनलोड करू शकता